कंत्राटी शिक्षकांचे आंदोलन स्थगित

कंत्राटी शिक्षकांचे आंदोलन स्थगित

Published on

कंत्राटी शिक्षकांचे आंदोलन स्थगित
पालघर (बातमीदार) ः पालघर जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर कंत्राटी शिक्षकांचे सुरू असलेले धरणे आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चातील आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्याने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री, आदिवासी विकासमंत्री यांच्यासोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत कंत्राटी शिक्षकांचा प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन कंत्राटी शिक्षकांचे तीन दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले.

Marathi News Esakal
www.esakal.com