कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारीला अटक

कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारीला अटक

Published on

कुख्यात गॅंगस्टर रवि पुजारी अटकेत

१० कोटींच्या खंडणीप्रकरणी कारवाई; १० दिवसांची पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गॅंगस्टर रविप्रकाश ऊर्फ रवि सुल्या पुजारी (५७) याला ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. बुधवारी त्याला ठाणे विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात २०१७ला भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का)अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तपासादरम्यान रवि पुजारी हा ‘पाहिजे’ आरोपी असल्याचे स्पष्ट झाले होते. संबंधित व्यावसायिकाकडे त्याने १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या कार्यालयावर गोळीबार करण्यासाठी हस्तक पाठविल्याची बाबही उघडकीस आली आहे. रवि पुजारी याच्यावर देशभरात सुमारे ४४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो परदेशातून गुन्हेगारी कारवाया करत असल्याने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. २०१९ मध्ये सेनेगलमधून त्याला अटक करण्यात आली होती आणि प्रत्यार्पण प्रक्रियेनंतर भारतात आणण्यात आले.

दरम्यान, १७ मार्चला बंगळूर येथील पॅरॉपन्ना अग्रहार कारागृहातून त्याला ताब्यात घेऊन या गुन्ह्यात अटक करण्यात आली. न्यायालयाने २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com