टीडब्ल्यूजे कंपनी संचालकांची बँक खाती रिकामी
टीडब्ल्यूजेच्या संचालकांची बँक खाती रिकामी
११ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक; पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ‘ट्रेड विथ जॅझ’ (टीडब्ल्यूजे) या गुंतवणूक कंपनीमार्फत उच्च परताव्याचे आमिष दाखवून सुमारे ११ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून, अटक संचालकांची विविध बँकांमधील खाती पूर्णपणे रिकामी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुख्य आरोपी समीर नार्वेकर याच्यासह इतरांकडून पाच गाड्या जप्त करण्यात आल्या असून, त्याचा एक बंगलादेखील शोधण्यात आला आहे. संबंधित मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपासात ठाणे जिल्ह्यातील ४३५ गुंतवणूकदारांची नोंद असून, त्यापैकी १६५ जणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या कंपनीने सरकारी प्रकल्पांचे खोटे दावे करत राज्यभरातील नागरिकांसह काही व्हीआयपी व्यक्तींनाही गंडा घातला. १६ शाखांद्वारे सुमारे ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक जमा करण्यात आल्याचा अंदाज आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांनी परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या एजंटपासून सावध राहावे आणि थेट पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक माधवी राजेकुंभार यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

