मुंबईच्या महापौर तावडेंविरोधात खटला चालणार

मुंबईच्या महापौर तावडेंविरोधात खटला चालणार

Published on

महापौर तावडेंविरोधात खटला चालणार 
दोषमुक्तीचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : जवळपास १० वर्षांपूर्वी सांताक्रूझस्थित शाळेतील शिक्षकांवर कथित हल्ला केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठी मागणी करणारा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा अर्ज सत्र न्यायालयाने नुकताच फेटाळून लावला. न्यायालयाच्या निर्णयामुळे महापौरांविरोधात आता खटला चालणार आहे.
शाळेच्या आवारात आपल्यावर प्रत्यक्ष शारीरिक हल्ला करणारी व्यक्ती या अर्जदार असल्याचे दोन पीडित शिक्षकांनी म्हटले आहे. त्यामुळे आरोप निश्चितीसाठी पुरेसा पुरावा उपलब्ध असल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. पी. मनथकर यांनी तावडेंचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताना निरीक्षणही नोंदवले.  इतर साक्षीदारांच्या जबाबांमध्येही तावडेंचे नाव आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी याप्रकरणी  गुन्हा घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.
सांताक्रूझ वाकोला परिसरातील शास्त्रीनगर येथील उर्दू माध्यम महापालिका शाळेत २९ जुलै २०१६ला शिक्षिका शाहीन खान यांची वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) एका शाळेत बदली झाली. खान यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू असल्यामुळे त्या नाराज होत्या. याच कारणास्तव, तावडे या इतर सहा जणांसह शाळेत पोहोचल्या आणि त्यांनी मुख्याध्यापिका आणि कर्मचाऱ्यांना बदलीच्या मुद्द्यावरून जाब विचारला. त्याचे रूपांतर एका वादात होऊन मोहम्मद याकूब राहीद व नदीम अहमद शेख या दोन शिक्षकांना कथितरीत्या मारहाण केली. त्यानंतर मुख्याध्यापिका शरीफा मोमीन यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तावडे आणि अन्य आरोपींविरुद्ध  गुन्हा दाखल केला होता.
...
तावडेंचा दावा काय?
भाजप नगरसेविका म्हणून त्यांच्या राजकीय पदाचा वापर केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केल्याचा दावाही तावडेंनी केला. गुन्हा दाखल करण्यासाठी झालेल्या १३ दिवसांच्या विलंबाकडेही तावडेंकडून लक्ष वेधण्यात आले. ही तक्रार राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा दावा करून तावडे यांची दोषमुक्तीचा अर्ज केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com