तीन हजार घरांची लवकरच लाॅटरी
तीन हजार घरांची लवकरच लाॅटरी
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जमवाजमव सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या खरेदीसाठी लाॅटरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून तब्बल २,८००-३,००० घरांची लाॅटरी काढली जाणार आहे. त्यासाठी घरांची जमवाजमव सुरू आहे. त्यामुळे म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असल्याने सर्वसामान्यांना खासगी विकसकांकडे घरखरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचे नेहमीच म्हाडाच्या लाॅटरीकडे डोळे लागलेले असतात. मुंबई मंडळाने याआधी २०२४मध्ये काढलेल्या २,०३० घरांच्या लाॅटरीसाठी एक लाख १४ हजार अर्ज आले होते; मात्र घरांची संख्या कमी असल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे मुंबई मंडळाची पुढील लाॅटरी कधी निघणार, याकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई मंडळाने तीन हजार घरांची लाॅटरी काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. त्यामध्ये ॲडव्हान्स काॅन्ट्रिब्युशनअंतर्गत बांधकाम सुरू केलेल्या २,८०० घरांचा समावेश असणार आहे. तसेच पवई, घाटकोपर, प्रतीक्षानगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या जवळपास ६४ गाळ्यांचा, तर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या वेगवगेळ्या ठिकाणच्या १४३ सदनिकांचा सामावेश असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. घरांची जमवाजमव सुरू असून किंमत निश्चितीनंतर जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
...
मुंबई मंडळांतर्गत सुमारे तीन हजार घरांची लाॅटरी काढण्याची तयारी सुरू असून त्याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. यामध्ये बांधकामाधीन असलेल्या घरांचाही समावेश असणार आहे.
- अनिल वानखडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

