अदाणी पॉवर करणार महावितरणला वीजपुरवठा
अदाणी पॉवर करणार
महावितरणला वीजपुरवठा
१६०० मेगावॉटसाठी ‘एलओआय’
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : राज्याच्या विजेच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महावितरण अदाणी पाॅवर लिमिटेडकडून १६०० मेगावाॅट वीज खरेदी करणार आहे. अदाणीकडून उभारल्या जात असलेल्या औष्णिक वीज प्रकल्पातून ही वीज पुरवली जाणार आहे. त्याबाबत महावितरणने कंपनीला हेतू पत्र दिले असल्याचे अदाणी पाॅवरने स्पष्ट केले आहे. अदाणीकडून २०३०-३१ या आर्थिक वर्षापासून पुढे २५ वर्षांसाठी प्रतियुनिट ५.३० रुपये एवढ्या दराने ही वीज पुरवली जाणार आहे. त्यामुळे महावितरणला आपल्या वीज ग्राहकांकडून नोंदली जाणारी विजेची मागणी पूर्ण करणे शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

