चवदार तळ्याच्या पाण्याद्वारे समतेचा संदेश राज्यभर

चवदार तळ्याच्या पाण्याद्वारे समतेचा संदेश राज्यभर
Published on

समतेचा संदेश राज्यभरात पोहोचवणार
चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. या ऐतिहासिक घटनेला ९९ वर्षे पूर्ण झाली असून, येत्या २० मार्च रोजी १००व्या वर्षात पदार्पण होत आहे. या घटनेच्या स्मरणार्थ बाबासाहेबांचा समतेचा संदेश राज्यातील संपूर्ण ३६ जिल्ह्यांत पोहोचवला जाणार असून, पवित्र चवदार तळ्याचे पाणी कलशाच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांत नेले जाणार आहे.

चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रदेश काँग्रेसच्या एससी विभागाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २० मार्च रोजी महाड येथून महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायातून समतेकडे जाण्याचा संदेश दिला आहे. या मोहिमेतून हा विचार पुढे नेणार असल्याचे काँग्रेसच्या एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी सांगितले. या अंतर्गत चवदार तळ्याच्या पाण्याचे कलश राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये नेऊन तेथील प्रमुख नद्यांमध्ये विसर्जित केले जाणार आहेत.

बाबासाहेबांचे जलविचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जलतज्ज्ञ म्हणून देशासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे. भाक्रा-नांगल धरणापासून ते देशातील नदीजोड प्रकल्पाच्या संकल्पनेपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण कल्पना मांडल्या होत्या. मात्र, अनेकांना याची माहिती नाही. त्यामुळे या मोहिमेद्वारे सर्व जिल्ह्यांत बाबासाहेबांचे जलक्रांतीविषयक विचार पोहोचवले जाणार आहेत. त्यासाठी विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे.
..
बाबासाहेबांचा ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहामागचा विचार सामाजिक न्यायातून समतेकडे जाण्याचा होता. या सत्याग्रहाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा विचार अधिक मजबुतीने प्रवाहित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- सिद्धार्थ हत्तीअंबीरे, प्रदेशाध्यक्ष, एससी विभाग, काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com