समाज कल्याण विभागातर्फे अभिनव उपक्रम
तृतीयपंथींच्या सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण
कल्याण-डोंबिवली महापालिकेचा अभिनव उपक्रम
कल्याण ता. १९ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे तृतीयपंथी नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. समाजकल्याण विभागामार्फत तृतीयपंथी बांधव-भगिनींसाठी शिवणकाम, अगरबत्ती तसेच साबण बनविणे या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच महापौर हर्षाली चौधरी आणि उपायुक्त कांचन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात शिवणकाम किटचे वाटप करण्यात आले.
महापौर हर्षाली चौधरी यांनी म्हटले, की तृतीयपंथी समाजाला स्वावलंबी करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम राबविले जातील. तर समाजविकास अधिकारी प्रशांत गवाणकर यांनी प्रशिक्षणार्थींनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःचे भविष्य घडवावे, असे आवाहन केले. महापालिका सदस्य मोरेश्वर भोईर यांनी समाजातील सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असे उपक्रम काळाची गरज असल्याचे नमूद केले.
उपक्रमाचे महत्त्व
प्रशिक्षणामुळे तृतीयपंथी नागरिकांना केवळ कौशल्य मिळणार नाही, तर रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील. समाजात मानाने जगण्यासाठी हा उपक्रम एक दिशादर्शक ठरणार आहे. या वेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

