विकास प्रकल्पांचा चित्ररथ ठरला प्रमुख आकर्षण
डोंबिवली शोभायात्रेत विकास प्रकल्पांचा चित्ररथ
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारला देखावा
कल्याण/डोंबिवली, ता. १९ : मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी डोंबिवली नगरीत काढण्यात आलेल्या यंदाच्या भव्य शोभायात्रेत कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकास कामांचे दर्शन घडविणारा चित्ररथ नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या चित्ररथात मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या हुबेहूब प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी खालच्या स्तरावर रस्ता/फ्लायओव्हर आणि वरच्या स्तरावर धावणारी मेट्रो अशा आधुनिक वाहतूक व्यवस्थेची झलक यात पाहायला मिळाली. तसेच खिडकाळी येथील प्राचीन श्री शिवमंदिराच्या सुशोभीकरण प्रकल्पाची देखणी प्रतिकृती भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. उल्हासनगर येथील सुपरस्पेशालिटी कॅशलेस हॉस्पिटलची प्रतिकृती साकारून सर्वसामान्यांना मिळणाऱ्या मोफत उपचारांची माहिती देण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील तरुणांसाठी उभारले जाणारे संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल आणि बेतवडे येथील आगरी-कोळी वारकरी भवनच्या प्रतिकृतींनी या चित्ररथाची शोभा वाढवली.
विकासाची नवी झेप
या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, की हा चित्ररथ म्हणजे केवळ प्रतिकृती नसून कल्याण लोकसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या कामांची ही एक छोटीशी झलक आहे. रस्ते, आरोग्य, क्रीडा आणि संस्कृती अशा सर्वच क्षेत्रांत सुरू असलेल्या प्रगतीचे प्रतिबिंब या शोभायात्रेत उमटल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

