उल्हासनगरातील महासभेत पेटला दूषित पाणीप्रश्न

उल्हासनगरातील महासभेत पेटला दूषित पाणीप्रश्न

Published on

उल्हासनगर महासभेत दूषित पाण्याचा प्रश्न पेटला
नगरसेवकाने महापौरांच्या टेबलावर ठेवली ‘गढूळ पाण्याची बाटली’
उल्हासनगर, ता. १८ (बातमीदार) : उल्हासनगर महापालिकेची बुधवारची महासभा गाजली ती सत्ताधारी आणि विरोधकांमधील वादाने नव्हे, तर शहरातील जळजळीत दूषित पाणीप्रश्नाने. प्रभाग १३ मधील लालचक्की परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून होणाऱ्या गढूळ पाणीपुरवठ्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना नगरसेवक सुरज सोनकांबळे यांनी चक्क दूषित पाण्याची बाटली महापौरांच्या समोर ठेवून संताप व्यक्त केला.

स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या निवडीसाठी बुधवारी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा सुरू असतानाच नगरसेवक सुरज सोनकांबळे यांनी आपल्या हातातील दूषित पाण्याने भरलेली बाटली महापौर अश्विनी निकम यांच्या समोर ठेवली. ‘‘हे पाणी आम्ही कसं प्यायचं,’’ असा रोकडा सवाल त्यांनी महापौर आणि आयुक्त मनीषा आव्हाळे यांना विचारला, ज्यामुळे सभागृहात काही काळ शांतता पसरली. कॅम्प नंबर ४, प्रभाग १३ मधील लालचक्की भागात गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित पाणी येत आहे. यावर वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. गढूळ पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथरोग पसरण्याची भीती सोनकांबळे यांनी व्यक्त केली. तक्रारीची दखल घेतली जात नसल्यानेच सभागृहात ही बाटली आणण्याची वेळ आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाचे आश्वासन
नाट्यमय प्रसंगानंतर महापौर अश्विनी निकम आणि आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेतली. संबंधित भागातील पाणीपुरवठ्याची तातडीने तपासणी करून दूषित पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com