आरोग्य शिबिरात विद्यार्थ्यांची तपासणी

आरोग्य शिबिरात विद्यार्थ्यांची तपासणी

Published on

आरोग्य शिबिरात विद्यार्थ्यांची तपासणी
जव्हार (बातमीदार) ः जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मंगळवारी जव्हार येथे थॅलेसेमिया स्क्रीनिंग चाचणी शिबिर घेण्यात आले. जनकल्याण पतसंस्था, जव्हार आणि अर्पण रक्तपेढी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने के. व्ही. हायस्कूल, भारती विद्यापीठ प्रशाला, आश्रमशाळा व इंग्लिश मीडियम शाळेत शिबिर पार पडले. या उपक्रमात ८७२ विद्यार्थ्यांची रक्ततपासणी करण्यात आली. त्यात के. व्ही. हायस्कूलचे २९७, भारती विद्यापीठ प्रशालेचे १६०, आश्रमशाळेचे २८८ आणि इंग्लिश मीडियमचे १२७ विद्यार्थी होते. कार्यक्रमास पतसंस्थेचे अध्यक्ष नरेंद्र महाले, उपाध्यक्ष दीपश्री भट तसेच संचालक व सल्लागार उपस्थित होते. संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवर्गानेही सक्रिय सहभाग घेतला. ग्रामीण भागात थॅलेसेमिया, सिकल सेल चाचण्या विशेषतः महिला व मुलींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com