आरटीई प्रवेशासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ

आरटीई प्रवेशासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ

Published on

आरटीई प्रवेशासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ

भाईंदर, ता. १९ (बातमीदार) : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमातील (आरटीई) तरतुदीनुसार ऑनलाइन प्रवेशासाठीची मुदत २५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी ऑनलाइन अर्ज भरावे, असे आवाहन मिरा-भाईंदर पालिकेने केले आहे.
दुर्बल व वंचित घटकांतील बालक शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायदा लागू करण्यात आला आहे. त्याद्वारे स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा या शाळांमध्ये या मुलांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेता येतो. कायद्यातील तरतुदीनुसार याआधी पालकांना परिसराच्या एक किमी अंतरापर्यंतची शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते; परंतु उच्च न्यायालयांच्या नागपूर खंडपीठाने नोंदवलेल्या निरिक्षणानुसार आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी एक किलोमीटर अंतरावर शाळा उपलब्ध नसेल तर मुलांना त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळेमध्ये प्रवेश घेण्यापासून रोखता येणार नाही. त्या अनुषंगाने आरटीई २५ टक्के प्रवेशाकरिता पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून अंतराची अट शिथिल करून शाळा दर्शविण्याबाबतची सुविधा संगणक प्रणालीवर देण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com