मालाड स्कायवॉक छपराविना; प्रवाशांचा त्रास वाढला
मालाड स्कायवॉक छपराविना; प्रवाशांचा त्रास वाढला
मालाड, ता. १९ (बातमीदार) : मालाड स्थानकाच्या पूर्वेकडील स्कायवॉकवरील छप्पर काढून टाकल्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना थेट उन्हात चालावे लागत आहे.
दररोज हजारो प्रवासी या स्कायवॉकचा वापर करतात. मात्र, छप्पर नसल्याने कडक उन्हामुळे प्रवाशांचे हाल होत असून, उष्माघाताचा धोका वाढल्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना याचा अधिक फटका बसत आहे.
स्थानिक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कामाची गती मंद असल्याची नाराजी व्यक्त केली आहे. “छपराचे काम कधी पूर्ण होणार,” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी स्कायवॉकवर छप्पर बसवण्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

