डहाणूतील प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासन सज्ज;
महालक्ष्मी यात्रेसाठी प्रशासन सज्ज
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी बैठकांचे सत्र
कासा, ता. १९ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी देवीची यात्रा २ एप्रिलपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दीमुळे कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये, म्हणून प्रशासनाकडून बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट कार्यालयात बुधवारी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची, ट्रस्ट पदाधिकाऱ्यांची व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. सलग १५ ते २० दिवस चालणाऱ्या या यात्रेत राज्याबाहेरील लाखो भाविक सहभागी होत असल्याने कायदा व सुव्यवस्था, तसेच भाविकांच्या सोयीसुविधा यावर विशेष भर देण्यात आला. बैठकीत स्वच्छतागृहांची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, पार्किंग व्यवस्था, वीजपुरवठा आणि यात्रेतील दुकानांची गर्दी या प्रमुख मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात्रेदरम्यान चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून टेहळणी पथकेही तैनात केली जाणार आहेत.
----------------------------------
यंत्रणा संख्या
सीसीटीव्ही कॅमेरे - ५४
सुरक्षा रक्षक - ६०
स्वयंसेवक - २०
सफाई कामगार - १६
---------------------------
दुकानदारांसाठी निर्देश
पाणीपुरवठा, मोबाईल शौचालये, अग्निशमन दल, वैद्यकीय सेवा, वीज वितरण, कचरा व्यवस्थापन, पार्किंग, रस्त्यावरील प्रकाश व्यवस्था, प्रत्येक दुकानदाराकडे अग्निशमन यंत्र कचरापेटी बंधनकारक करण्यात आली आहे. उड्डाणपुलाखाली दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली असून, डोंगरावरील मार्गांवरही पथदिव्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

