बेकायदा उत्खननाला चाप
बेकायदा उत्खननाला चाप
खनिकर्म विभाग यंत्रणा उभारणार
पालघर, ता. १९ ः पालघर जिल्ह्यातील बेकायदा उत्खनन रोखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन (इटीएस) यंत्राच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. खनिकर्म विभागाच्या यंत्रणेमुळे नियमापेक्षा जास्त उत्खनन करणाऱ्यांना चाप बसणार आहे.
पालघर जिल्ह्यात मोठे प्रकल्प सुरू आहेत, तर काही प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात दगड, माती, मुरूम असे गौणखनिज लागते. गौणखनिज पुरवठादार आणि उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांकडून नियमानुसार परवानगी घेतली जाते. मात्र, परवानगीवेळी दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक गौणखनीज उत्खननच्या तक्रारी वाढल्या आहेत. वनजमिनी, खासगी जमिनी तसेच आदिवासी खातेदारांच्या जमिनीतून बेकायदेशीर उत्खनन होत असल्याने इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन (इटीएस) घेण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने मंजूर केला आहे.
------------------------------
ईटीएस यंत्राचे फायदे
- जुन्या काळातील मानवी पद्धतीने चैन किंवा टेप सर्वेक्षणाची जागा घेणारे स्वयंचलित आणि वेगवान मोजणी करणारे आधुनिक तंत्रज्ञान आहे. उत्खनन क्षेत्रफळाची लांबी, रुंदी व खोलीचे मोजमाप घेऊन उत्खननाचे घनफळ उपकरण दर्शवते. सरासरीपेक्षा अचूक मोजमाप केले जाते.
-बेकायदा गौणखनिज तक्रार आल्यास मनुष्यबळ, इतर तांत्रिक मर्यादेमुळे तक्रारी सोडवायला वेळ लागत असे. मात्र, या उपकरणामुळे एका महिन्यात ५० तक्रारी सोडवल्या जातील, अशी अपेक्षा असल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी संदीप पाटील यांनी म्हटले आहे.
---------------------------------
राष्ट्रीय प्रकल्पांसाठी ज्या परिसरातून उत्खनन झाले आहे. त्या ठिकाणचे मोजमाप व गौणखनिज शुल्क भरण्याची खातरजमा केल्याशिवाय प्रकल्प अंतिम करून दिले जाणार नाहीत. जिल्ह्यातील लागणाऱ्या उत्खननावर पारदर्शकपणे लक्ष ठेवण्यासाठी यंत्रे घेतली जात आहेत.
- डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

