वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय
वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय
मिरा-भाईंदरमध्ये खासगी बससाठी वाहनतळ
भाईंदर, ता. १९ (बातमीदार) : रस्त्यांवर बेकायदा उभ्या राहणाऱ्या खासगी बसमुळे मिरा-भाईंदर शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते. यासाठी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर खासगी बससाठी शहरात वाहनतळ उभारण्यात येणार आहेत.
शहरात वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होऊ लागली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या खासगी बसमुळे भर पडेत. शाळांच्या विद्यार्थ्यांची ने आण करण्यासाठी या बस पुरविल्या जातात. शहरात अनेक ट्रॅव्हल कंपन्या आहेत. त्यांच्या प्रवासी वाहतुकीच्या बस रस्त्यावरच उभ्या केल्या जातात. आधीच शहरात वाहनांची गर्दी वाढत आहे. त्या तुलनेत रस्ते अरुंद आहेत. अशावेळी खासगी बस रस्त्याच्या कडेला उभ्या रहात असल्याने वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळत आहे. या बसवर वाहतूक पोलिस कारवाई करतात. मात्र, बस उभ्या करण्यासाठी अन्य पर्याय नसल्याने निर्जन रस्त्यावर उभ्या केल्या जातात, पण अशा ठिकाणांवर गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे खासगी जागेचा पालिका विचार करत आहे.
------------------------------
मोक्याच्या जागांचा शोध
खासगी जमीनमालकांना त्यांच्या मोकळ्या जमिनी वाहनतळासाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन पालिका करणार आहे. या जागांवर बस उभ्या करण्यासाठी आवश्यक असलेले शुल्क जमीन मालकच घेणार आहेत. मात्र, शुल्क किती असावे त्याचा निर्णय महापालिका घेणार आहे. यासाठी शहरातील मोक्याच्या जागांचा शोध पालिकेकडून सुरू झाला आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ः------------------------------
खासगी बस वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत असल्याने वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या वाहनतळावरच बस उभ्या करणे बंधनकारक आहे अन्यथा वाहतूक पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मिरा-भाईंदर पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

