ठाण्याच्या मानपाडा येथे फ्लॅटमध्ये आग

ठाण्याच्या मानपाडा येथे फ्लॅटमध्ये आग

Published on

मानपाडा येथे फ्लॅटला आग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : ठाण्यातील मानपाडा येथील स्नोड्रॉप इमारतीच्या सातव्या मजल्यावरील रूम क्रमांक ७०२ या फ्लॅटमध्ये बुधवारी (ता. १८) आग लागली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले होते. सुमारे ८.४५ वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत अनिल जगवानी यांच्या मालकीच्या घरातील कपाट, एसी, सीलिंग, बेड व विद्युत वायरिंग जळून नुकसान झाले असून, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com