सांस्कृतिक परंपरांचे दर्शन

सांस्कृतिक परंपरांचे दर्शन

Published on

सांस्कृतिक परंपरांचे दर्शन
वाड्यातील शोभायात्रेत विद्यार्थ्यांचा सहभाग
वाडा, ता. १९ (बातमीदार)ः मराठी नववर्षाच्या निमित्ताने वाडा शहरात शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानिमित्ताने सामाजिक, सांस्कृतिक परंपरांचे दर्शन या वेळी घडले.
चैत्र पाडव्याचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होते. मराठी संस्कृतीमध्ये शालिवाहन शक या कालगणनेला प्रारंभ झाला. याच दिवशी प्रभू रामचंद्र वनवास संपवून अयोध्येत परतल्याने अधिक महत्त्व आहे. मराठी संस्कृतीची सांस्कृतिक परंपरा जपावी आणि नव्या पिढीत ही सांस्कृतिक मूल्य रुजावीत म्हणून वाडा शहरात गुढीपाडव्याला निघणारी शोभायात्रा आकर्षण असते. शहरातील राममंदिरापासून ते खंडेश्वरी नाकादरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत महाराष्ट्रातील विविध संत-महात्म्यांच्या वेशभूषेतून मुलांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर लेझीम, ढोल-ताशा पथकांचेही संचालनाने शोभायात्रेची रंगत वाढवली. या वेळी पारंपरिक वेशभूषेतून सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडले.
------------------------------
सर्वपक्षीय नेते सहभागी
शोभायात्रेत भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले, शिवसेनेचे नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नीलेश गंधे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, भाजपचे संदीप पवार, वाड्याच्या नगराध्यक्ष रीमा गंधे, उपनगराध्यक्ष मनीष देहरकर, नगरसेवक भारती सपाटे, सुचिता पाटील, विराज पाटील, तेजस पाटील, आशिकेश पवार, माजी नगरसेवक वैभव भोपतराव, काँग्रेसचे शहराध्यक्ष सुशील पातकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, भाजपचे युवा नेते कुणाल साळवी यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com