योगराज शिरसाठ यांची सरचिटणीसपदी निवड

योगराज शिरसाठ यांची सरचिटणीसपदी निवड

Published on

योगराज शिरसाठ यांची सरचिटणीसपदी निवड
कासा (बातमीदार) ः पालघर जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या नव्या कार्यकारी मंडळाची निवड उत्साहात पार पडली. यामध्ये योगराज शिरसाठ यांची सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली. तसेच विनायक शेळके (जव्हार) यांची अध्यक्षपदी, स्टॅनी अल्मेडा (वसई) यांची उपाध्यक्षपदी, सोमनाथ कोलिकर (मोखाडा) यांची खजिनदारपदी, प्रल्हाद सावंत (वाडा) यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली. २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध निवड करण्यात आली. या सभेला माजी अध्यक्ष हरिश्चंद्र वझे, १४ नवनिर्वाचित सदस्य तसेच सातही तालुक्यांचे पदसिद्ध सदस्य उपस्थित होते. नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स असोसिएशनचे सचिव मारुती वाघमारे, कासा विभाग अध्यक्ष हेमंत धानमेर तसेच सर्व तालुकाध्यक्षांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com