सुरांच्या मैफिलीत नववर्षाचे स्वागत
सुरांच्या मैफलीत नववर्षाचे स्वागत
पालघर शहरात शोभायात्रेतून सांस्कृतिक दर्शन
पालघर, ता.१९ (बातमीदार)ः शहरातील लक्ष्मीनारायण मंदिराच्या परिसरात ‘सूर पहाटे’च्या कार्यक्रमातून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या वेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडविणारी शोभायात्रा, शिवरुद्र मंडळाच्या ढोल-ताशांच्या गर्जनात लेझीम, लाठी, तलवारबाजी आकर्षण राहिले.
संस्कार भारती आणि गुढीपाडवा स्वागतयात्रा मंडळ यांच्या वतीने सांस्कृतिक मैफल, तर पालघर साहित्य व कला प्रतिष्ठानतर्फे पुस्तक गुढी असे कार्यक्रम घेण्यात आले. या वेळी सांगीतिक कार्यक्रमातील प्रथा पाटील, संजय महाजन, जगदीश भारद्वाज यांच्या गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमानंतर लक्ष्मीनारायण मंदिराकडून पालघर शहरात शोभायात्रा काढण्यात आली. तसेच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मनोविकास ग्रंथोत्सव आणि पालघर साहित्य व कला प्रतिष्ठान तर्फे यंदा पुस्तक गुढी उभारण्यात आली. या वेळी शोभायात्रेत आर्यन शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य तर शिवमुद्रा ढोल-ताशा मंडळाच्या ढोल-ताशांच्या गर्जनातील नृत्य सादरीकरणाने महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

