सात जणांना नवे आयुष्य, मुंबईतील यंदाचे १७वे देहांतर्गत अवयवदान

सात जणांना नवे आयुष्य, मुंबईतील यंदाचे १७वे देहांतर्गत अवयवदान

Published on

सात जणांना
मिळाले नवजीवन

मुंबई, ता. १९ : पक्षाघातामुळे मेंदूमृत झालेल्या ६० वर्षीय संजय शहा यांच्या कुटुंबाने अवयवदानाचा निर्णय घेतल्याने सात जणांना नवजीवन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहा यांचे यकृत, मूत्रपिंड, कॉर्निया आणि हाडे दान करण्यात आली. मुंबईतील हे यंदाचे १७वे अवयवदान ठरले आहे.
ठाणे येथील ज्युपिटर लाइफलाइन रुग्णालयात अवयवदानाची प्रक्रिया पार पडली. पॅथॉलॉजीचालक संजय शहा यांना पक्षाघात झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेंदूमृत झाल्याने डॉक्टरांनी कुटुंबीयांना अवयवदानाचा पर्याय सुचवला. त्यांनी होकार दिल्यानंतर अवयवदानाचा निर्णय घेण्यात आला. राज्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार अवयवांचे वितरण करण्यात आले असून यकृत आणि मूत्रपिंडे प्रत्यारोपणासाठी देण्यात आली, तर कॉर्निया आणि हाडांच्या ऊतीही दान करण्यात आल्या, अशी माहिती झेडटीसीसी (झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर) मुंबईकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com