कल्याण पूर्वेत गॅससाठी प्रतीक्षा
अफवांमुळे गॅस सिलिंडरसाठी रांगा
तुटवडा नसल्याचे वितरकांचे स्पष्टीकरण
कल्याण, ता. १९ (बातमीदार) : जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवर पसरलेल्या चुकीच्या माहितीमुळे कल्याण पूर्व परिसरात गॅस सिलिंडरसाठी मोठी धावपळ उडाली आहे. अमेरिका, इस्राईल आणि इराण संघर्षाचा परिणाम गॅसपुरवठ्यावर होईल, या अफवेमुळे घाबरलेल्या नागरिकांनी एकाच वेळी बुकिंगचा धडाका लावल्याने वितरण यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे.
गॅसपुरवठा बंद होणार या भीतीने हजारो ग्राहकांनी अचानक बुकिंग केल्याने, जिथे दोन दिवसांत सिलिंडर मिळायचा तिथे आता ८ ते १० दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक नागरिकांनी खबरदारी म्हणून बाजारातून इलेक्ट्रिक शेगड्या खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. अफवेचा इतका धसका घेतला आहे की, काही कुटुंबांनी तर शहरात उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून थेट आपल्या मूळ गावी जाऊन चुलीवर स्वयंपाक करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
साठा मुबलक
कल्याण पूर्वेतील गॅस वितरकांनी स्पष्ट केले आहे की, देशात कोणताही गॅस तुटवडा नाही. पुरवठा साखळी सुरक्षित असून, केवळ नागरिकांनी एकाच वेळी मागणी वाढवल्यामुळे वितरणाला विलंब होत आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या मेसेजेसवर विश्वास ठेवू नये. साठेबाजी केल्यामुळेच गरजूंना वेळेत सिलिंडर मिळण्यास अडचण येत आहे. गॅसपुरवठा खंडित होणार नाही, त्यामुळे कृपया ‘पॅनिक बुकिंग’ टाळावे, असे स्थानिक गॅस वितरकांनी आवाहन केले आहे.
प्रशासनाचे आवाहन
सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात असून, नागरिकांनी कोणत्याही अधिकृत माहितीशिवाय असे मेसेज फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

