डहाणू महोत्सवाला सुरुवात

डहाणू महोत्सवाला सुरुवात

Published on

डहाणू ‘फेस्टिव्हल-२०२६ ’चे आज उद्‍घाटन
संस्कृती, खाद्यपरंपरा आणि कलेचा संगम

कासा, ता. १९ (बातमीदार) : डहाणूची समृद्ध संस्कृती, खाद्यपरंपरा आणि स्थानिक कलेचा गौरव करणारा ‘फेस्टिव्हल २०२६- उत्सव परंपरेचा, उत्सव आपल्या मातीचा’ हा भव्य तीनदिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव शुक्रवार (ता. २०) पासून पुढील तीन दिवस डहाणू बीच येथील सी-व्ह्यू पार्क येथे दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत पार पडणार आहे.
या महोत्सवाचे उद्‍घाटन शुक्रवार दुपारी १२.३० वाजता महाराष्ट्र राज्य परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी डहाणू नगराध्यक्ष राजेंद्र लखु माच्छी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित असतील.
महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा उपक्रम, संगीत मैफिली तसेच खाद्यपदार्थ व शॉपिंग स्टॉल्सचा आकर्षक संगम पाहायला मिळणार आहे. पहिल्या दिवशी ढोल पथकासह भव्य उद्‍घाटन मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी रंगत वाढणार आहे. दुपारच्या सत्रात कोल्हापूर येथील शांतिदूत मर्दानी आखाड्याकडून शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. रात्री ‘झी मराठी’ प्रस्तुत ‘उत्सव नात्यांचा’ हा विशेष कार्यक्रम रंगणार आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी मॅरेथॉन व विविध फिटनेस उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी राष्ट्रीय शाहीर मंचाचे शाहीर श्रीकांत शिर्के यांच्याकडून ‘गाथा महाराष्ट्राची’ हा कार्यक्रम सादर होणार असून, रात्री ‘इंडियन आयडॉल’मधील गायिका श्वेता दांडेकर यांच्या आवाजात ‘बॉलीवूड नाइट’ची रंगत पाहायला मिळणार आहे.
तिसऱ्या दिवशी ‘सुगम पहाट’ या बीच व निसर्ग उपक्रमाने दिवसाची सुरुवात होईल. सायंकाळी बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, रात्री डीजे हाय एनर्जी क्लोजिंग नाइट, समारोप सोहळा आणि आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीने महोत्सवाची सांगता होणार आहे. संस्कृती, संगीत, खाद्यपदार्थ, शॉपिंग आणि ॲडव्हेंचर उपक्रमांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डहाणू महोत्सव समितीकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com