उल्हासनगरमध्ये स्थायी समितीचे १६ सदस्य नियुक्त

उल्हासनगरमध्ये स्थायी समितीचे १६ सदस्य नियुक्त

Published on

उल्हासनगर, ता. १९ (बातमीदार) : उल्हासनगर महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना व भाजपला प्रत्येकी आठ सदस्यांचे समान प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. महापौर अश्विनी निकम यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे वंचित घटकाला संधी दिल्याने चर्चा रंगली आहे.

शिवसेनेच्या वतीने दिलीप गायकवाड, जमनू पुरस्वानी, राजेंद्रसिंह भुल्लर महाराज, कलवंतसिंग सोहता, जया प्रकाश माखीजा, महेश सुखरामानी, डिंपल कुमारी ठाकूर आणि विकास खरात यांची निवड करण्यात आली आहे. वंचित घटकांचे प्रतिनिधित्व करत विकास खरात यांना संधी दिली आहे. भाजपकडून राजेश वधारिया, अर्चना करणकाळे, कविता पंजाबी, रवि जग्यासी, दीपक (टोनी) सिरवानी, राजेश वानखेडे, शंकर (शेरी) लुंड आणि संजय सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता स्थायी समिती सभापतिपद शिवसेना की भाजपच्या वाट्याला जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सभापती पदाची उत्सुकता
 स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी जया माखीजा, राजेंद्रसिंह भुल्लर महाराज, राजेश वधारिया आणि दीपक (टोनी) सिरवानी यांनी सभापतीपद भूषवलेले आहे. यंदा पुन्हा यापैकी कोणाला संधी मिळते की नव्या चेहऱ्याला संधी दिली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com