माघी गणपतीच्या पैशांच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला

माघी गणपतीच्या पैशांच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला

Published on

माघी गणपतीच्या पैशांच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : माघी गणपतीच्या बॅन्जोच्या पैशांच्या वादातून एका तरुणावर चाकूहल्ला केल्याची घटना वागळे इस्टेट परिसरात समोर आली आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.
प्रतिक सकट (वय ३०) कळवा येथील एफ.टी.ओ. ऑफिसमध्ये वाहनांच्या आयएनडी नंबर प्लेट डिलिव्हरीचे काम करतात. त्यांचा मित्र सोहम नांगरे (वय २१) हा किसननगर येथील बल्लाळेश्वर मित्र मंडळाचा अध्यक्ष आहे. जानेवारी २०२६ मध्ये मंडळाने माघी गणपती बसवून विसर्जनावेळी बॅन्जोची ऑर्डर दिली होती. मात्र, त्या ऑर्डरचे पैसे न दिल्याने संबंधित व्यक्तीने वारंवार सकट यांच्याकडे पैशांची मागणी केली. यावरून सकट व नांगरे यांच्यात वाद झाला होता. गुरुवारी (ता. १९) सकट हे किसननगर येथील मैदानासमोरील मित्रांसोबत गप्पा मारत असताना सोहम नांगरे हा अचानक पाठीमागून येऊन त्याने चाकूने सकट यांच्यावर वार केले.
हल्ल्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सकट यांच्या वडिलांनी श्रीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com