थायलंडच्या जांभळांची मोखाड्यात चव

थायलंडच्या जांभळांची मोखाड्यात चव

Published on

थायलंडच्या जांभळांची मोखाड्यात चव
पळसपाडा येथील उच्चशिक्षित तरुणाची अभिनव शेती
मोखाडा, ता. १९ (बातमीदार)ः पालघर जिल्ह्यातील बाहाडोली गावातील जांभळांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. अशातच पळसपाडा येथील उच्चशिक्षित तरुणाच्या थायलंडच्या पांढऱ्या जांभळाच्या शेतीमुळे परदेशातील फळांची चव आता मोखाड्यात चाखायला मिळणार आहे.
अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील नर्सरीतून डॉ. सुमीत ढाक यांनी थायलंड पांढऱ्या जांभळाची शंभर रोपे जून २०२३ मध्ये मोखाड्यातील पळसपाडा येथील शेतीवर लावली होती. शेणखत तसेच ठिबक सिंचन पद्धतीने व्यवस्थापन केले होते. तीन वर्षांनंतर या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर येऊन पांढऱ्या जांभळाची लगड लागली आहे. प्रतिझाड पाच ते सहा किलो उत्पादन अपेक्षित असून, १५० ते १६० रुपये प्रतिकिलो फळांना बाजारभाव आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वजा करून ५० हजारांचा नफा अपेक्षित आहे.
---------------------------
कमी खर्चात जास्त उत्पन्न
झाडांची उंची कमी असते. साधारण तीन वर्षांपासूनच फळधारणा सुरू होते. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्याने पालघरसह नाशिक तसेच कोकणातील उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अशा पिकांकडे वळावे, असे डॉ. ढाक सांगतात. विशेष म्हणजे, काळ्या जांभळांप्रमाणेच पांढऱ्या जांभळांना आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्व आहे. मधुमेह, किडनी विकारांसाठी हे फळ लाभदायक असून, चविष्ट असल्याने बाजारात मागणी वाढली आहे.
------------------------
मोखाडा तालुक्यातील स्थलांतर, कुपोषण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बारमाही पीक देणारी शेती गरजेची आहे. त्यामुळे प्रशिक्षण केंद्रातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा मानस आहे.
- डॉ. सुमीत ढाक, प्रयोगशील शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com