महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळा तर्फे स्वयंचलित स्वच्छता मशिन चे लोकार्पण

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळा तर्फे स्वयंचलित स्वच्छता मशिन चे लोकार्पण

Published on

काशिद किनारा होणार चकाचक
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे स्वयंचलित स्वच्छता मशीनचे लोकार्पण
मुरूड, ता. १९ (बातमीदार) ः राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुढाकाराने किनाऱ्यावर स्वच्छता राखण्यासाठी स्वयंचलित स्वच्छता यंत्र देण्यात आले. काशिद ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नेहा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांतून हे यंत्र मिळाल्याची माहिती ग्रामपंचायत सरपंच संतोष राणे यांनी दिली. या यंत्राचे मुरूड पंचायत समितीचे सभापती नीलेश घाटवळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी मुरूड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, माजी सभापती रमेश नागावकर, काशीद ग्रामपंचायत सरपंच संतोष राणे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भरत बेलोसे, काशीद ग्रामपंचायत सदस्य सुविधा दिवेकर, समीक्षा दिवेकर, दीपेश कासार, नीलेश दिवेकर, ईश्वर चाचे, ग्रामपंचायत अधिकारी सुशांत ठाकूर, भोईघर ग्रामपंचायत अधिकारी संतोष नागोठकर, नांदगाव सरपंच अल्पा घुमकर, यशवंत पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी प्रशांत खेडेकर, पूजा महाडिक आदी उपस्थित होते.
काशिद समुद्रकिनारा सुमारे दोन किलोमीटरहून अधिक विस्तीर्ण असून, सरासरी सात लाखांपेक्षा जास्त पर्यटकांची पसंती या स्थळाला असते. यामुळे प्लॅस्टिक कचरा, उष्ट्या पत्रावळ्या, घोड्यांची लीद मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारी आढळते. हे लक्षात घेऊन समुद्रकिनारा स्वच्छ राहण्यासाठी सुमारे ७५ लाख रुपये खर्चून राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने स्वयंचलित समुद्रकिनारा स्वच्छता यंत्र देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
सरपंच संतोष राणे यांनी काशीद समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी मोठे मनुष्यबळ लागत होते. आता मशीन उपलब्ध झाल्याने समुद्रकिनारा जलद गतीने स्वच्छ होणार आहे, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com