रामबाग परिसरात भटक्या श्वानांची दहशत

रामबाग परिसरात भटक्या श्वानांची दहशत

Published on

रामबाग परिसरात भटक्या श्वानांची दहशत
नगरसेविका स्वप्नाली केणे यांनी वेधले महासभेचे लक्ष
कल्याण, ता. १९ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर बनला असून, कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या समस्येकडे प्रभाग क्र. ६ च्या शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या नगरसेविका स्वप्नाली केणे यांनी महासभेत आक्रमकपणे लक्ष वेधले. पहिल्याच महासभेत त्यांनी मांडलेल्या या जळजळीत प्रश्नामुळे सभागृहात हा विषय चांगलाच गाजला.

रामबाग परिसरात सध्या सुमारे १२५ ते १५० भटक्या श्वानांचा वावर आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत शेकडो नागरिकांना या श्वानांनी चावा घेतला आहे. या परिसरात चार शाळा आणि दोन महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. श्वानांच्या हल्ल्यांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही श्वानप्रेमी या श्वानांना कच्चे मांस खाऊ घालत असल्याने त्यांचे वर्तन अधिक आक्रमक झाले असून, चावण्याचे प्रमाण वाढले असल्याचा दावा स्वप्नाली केणे यांनी केला.

प्रभावी मांडणी
नगरसेविका स्वप्नाली केणे यांनी महापालिकेने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. श्वानांचे निर्बीजीकरण आणि आक्रमक श्वानांचा बंदोबस्त करून नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे, असे त्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले. गृहिणी ते लोकप्रतिनिधी असा प्रवास करणाऱ्या स्वप्नाली केणे यांनी पहिल्याच महासभेत जनसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी आवाज उठवल्याने रामबाग परिसरातील नागरिकांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com