गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी ऑफरचा धमाका
गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी ऑफरचा धमाका
अलिबाग, ता. १९ (वार्ताहर) ः गुढीपाडवा गुरुवारी (ता. १९) जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी नववर्षाच्या या मुहूर्तावर नागरिक नवीन वस्तू खरेदी करण्यास पसंती दिली जाते. यानिमित्त रायगडमधील बाजारपेठामध्ये फ्रीज, एसीपासून ते दुचाकी-चारचाकी वाहने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.
गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत केल जाते. या दिवशी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. अनेकांचा जागा, घर, सोन्या-चांदीसह वाहन खरेदीकडे कल असतो, तर विक्रेत्यांकडूनही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजरात वेगवेगळ्या सवलती सुरू करण्यात आल्या आहेत. या सवलतींचा फायदा घेत ग्राहकांनी वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती.
शोभायात्रा
गुढीपाडवा म्हणजे मांगल्याचे व हिंदू नववर्षाचे स्वागत करणारा सण. त्यामुळे या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था, मंडळांकडून शोभायात्रा उत्साहात पार पडल्या. यामध्ये ढोल-ताशा पथक, विविध वेशभूषा करून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

