महावितरणच्या ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम’ला राष्ट्रीय पुरस्कार
महावितरणच्या ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टीम’ला राष्ट्रीय पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : महावितरणने स्मार्ट ग्रिडअंतर्गत विकसित केलेली ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टीम’ देशात सर्वोत्तम ठरली आहे. इंडिया स्मार्ट ग्रिड फोरमच्या आंतरराष्ट्रीय स्मार्ट एनर्जी व इनोव्हेशन परिषदेमध्ये नुकताच या तंत्रज्ञानासाठी महावितरणचा ‘आयएसजीफ इनोव्हेशन अवॉर्ड २०२६’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरव करण्यात आला.
नवी दिल्ली येथे ‘इंडिया स्मार्ट युटिलिटी विक २०२६’अंतर्गत बाराव्या आंतरराष्ट्रीय स्मार्ट एनर्जी व इनोव्हेशन परिषद झाली. महावितरणच्या ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टीम’ची अंमलबजावणी व फलनिष्पत्तीचे सादरीकरण त्यामध्ये करण्यात आले. त्याचा अभ्यास करून पाच सदस्यीय राष्ट्रीय निवड समितीने या तंत्रज्ञानाची परिषदेतील सर्वोत्तम पुरस्कारासाठी निवड केली. सेवानिवृत्त केंद्रीय ऊर्जा सचिव पी. उमाशंकर यांच्या हस्ते महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रेय पडळकर व मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) अविनाश हावरे यांनी महावितरणच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टीम’च्या तंत्रज्ञानामुळे विजेच्या मागणीचे अचूक नियोजन होत आहे. विजेची मागणी किती राहील, याचे अचूक पूर्वानुमान या प्रणालीद्वारे होत आहे. त्यामुळे महावितरणच्या वीज खरेदीमध्ये आर्थिक बचत सुरू झाली असून सुमारे एक हजार १०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची बचत करण्यात आली आहे. तसेच तांत्रिक आणि वाणिज्यिक हानीमध्ये मोठी घट होऊन देखभाल-दुरुस्तीचा खर्चही कमी झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

