भिवंडीत फर्निचर मार्केटमधील आगीत दुकाने खाक
भिवंडीत फर्निचर मार्केटमधील आगीत दुकाने खाक
भिवंडी, ता. १९ (वार्ताहर) : भिवंडी-ठाणे मार्गावरील कशेळी खाडी परिसरात फर्निचर मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी आग लागून अनेक दुकाने खाक झाली. अग्निशामक दलाने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
भिवंडी-ठाणे रस्त्यालगत कशेळी खाडीजवळील चामुंडा कॉम्प्लेक्समधील फर्निचर मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी सुमारे ११च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सुमारे आठ ते १६ दुकाने पूर्णतः खाक झाली. ही दुकाने मेट्रो लाइनच्या अगदी जवळ असल्याने आगीचा परिणाम मेट्रोच्या पिलर्सवरही झाला असून, ते काळवंडल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन आणि ठाणे अग्निशामक दलाच्या एका अशा एकूण तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, खालच्या रांगेतील दुकानांना आग लागलेली असताना वरच्या दुकानांमधील साहित्य वाचवण्यासाठी दुकानदारांनी धावपळ केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे काही प्रमाणात माल सुरक्षित ठेवण्यात यश आले. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

