आयआयटीच्या तीन विद्यार्थ्यांचा द्रुतगती मार्गावर भीषण अंत
आयआयटीच्या तीन विद्यार्थ्यांचा द्रुतगती मार्गावर भीषण अंत
पवई कॅम्पसमध्ये शोककळा
पनवेल, ता. १९ (वार्ताहर) : खंडाळा येथून मुंबईत परतणाऱ्या मुंबई आयआयटीतील विद्यार्थ्यांच्या कारला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाल्याने या कारमधील तिन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. १९) सकाळी पनवेलजवळ घडली. कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे पवई येथील आयआयटीच्या कॅम्पसमध्ये शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आयआयटीत शिक्षण घेणारे ओम कुमार बोरसे, श्रेयांश शर्मा, लय देशभ्रतार, हितेश कुमार मीणा, सोहम चव्हाण आणि सिद्धांत जेबल हे सहा विद्यार्थी बुधवारी रात्री ११च्या सुमारास चित्रपट पाहण्यासाठी कॅम्पसमधून बाहेर पडले होते. त्यानंतर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ते खंडाळा येथील सनराईज पॉइंट पाहण्यासाठी तीन वेगवेगळ्या कारमधून लोणावळ्याच्या दिशेने गेले होते. पहाटे सूर्योदय पाहिल्यानंतर सर्व जण परतीच्या प्रवासाला निघाले होते. या वेळी ओम कुमार बोरसे (वय २३, रा. नाशिक), श्रेयांश शर्मा (२२, रा. जयपूर) व लय देशभ्रतार (२०, रा. नागपूर) हे तिघेही एका फोक्सवॅगन पोलो कारमध्ये होते, तर त्यांचे इतर तीन मित्र दोन कारमधून मुंबईच्या दिशने येत होते. भाताण बोगदा ओलांडल्यानंतर दुसऱ्या लेनमधून वेगाने येत असताना कंटेनर ट्रेलरला ओव्हरटेक करण्यासाठी चालकाने कार तिसऱ्या लेनमधून अचानक सर्व्हिस लेनमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुढे असलेल्या कंटेनर ट्रेलरवर धडकून ओम, श्रेयांश व लय या तिन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थ्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांनी याबाबत माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

