इलीशा शर्माची प्रेरणादायी कहाणी
धाडसाने घडविले कला क्षेत्रात करिअर
इलिशा शर्माची गगनभरारी
मुंबई, ता. २३ ः ठाण्यात लहानाची मोठी झालेल्या इलिशा शर्मा हिने बालपणापासून ग्रिड्स, पॅटर्न्स, डिझाइनबाबत कुतूहल होते. डिझाइन म्हणजे काय, याबाबत त्या वेळी तिच्याकडे स्पष्टता नव्हती. मात्र आपल्यातील प्रतिभेचा शोध घेण्यासाठी तिने बास्केटबॉल, जलतरण, कथ्थक, गायन, पियानोवादन असे विविध छंद जोपासले. परंतु शाळेतील प्रकल्पांची पोस्टर, वाढदिवसाची शुभेच्छापत्रके स्वतः तयार करण्यासाठी ती रात्री उशिरापर्यंत जागरण करायची.
कला क्षेत्रातील तिचे हेच कुतूहल तिला आयुष्यातील एक मोठा निर्णय घेण्यास कारणीभूत ठरले.
वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी इलिशा डिझाईन क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी ठाण्याहून अमेरिकेला गेली. जॉर्जिया येथील सवाना कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन येथून ग्राफिक डिझाइनमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर तिने स्वतःला कसा डिझायनर घडवायचे आहे हे शोधले. त्यासाठी तिने शिकागोमध्ये तिला हव्या असलेल्या एजन्सीत इंटर्नशिपची संधी मिळाली; परंतु त्या ठिकाणी एकच अडचण होती, ती म्हणजे ईएडी कार्ड मिळाले नव्हते. ते मिळेपर्यंत ती काम सुरू करू शकत नव्हती. त्यामुळे शिकागोला जायचे की नाही, याबाबत ठोस निर्णय घेता येत नव्हता. परंतु इलिशाने धोका पत्करला आणि विमानाचे तिकीट काढले. तिचा हाच धाडसी निर्णय तिला अवघ्या दोन महिन्यांत इंटर्नपासून ते पूर्णवेळ नोकरीपर्यंत घेऊन गेला आणि बघता बघता ती पुढे डिझायनर आणि सोशल स्ट्रॅटेजी विभागाची प्रमुख झाली. सध्या ती अनेक प्रसिद्ध ब्रँड्ससोबत काम करीत आहे. उदा. पॉपटार्ट्स, मार्स, केलॉग्स, बीक, आयएएमएस, टाऊनहाऊस, सिम्पल मिल्स, कॅडेन्स ओटीसी, पूल-अप, हगीज् आणि अवीनो. नेकेड स्मूदीजला खास जेन-झीसाठी ‘बूस्टेड स्मूदी’ म्हणून ओळख देण्यात तिचे योगदान मोठे आहे.
---
विनामूल्य ब्रँडिंग सेवा
इलिशा दरवर्षी शिकागोतील एका एनजीओला विनामूल्य ब्रँडिंग सेवा पुरविते. अनेक एनजीओ समाजाभिमुख कामात एवढ्या गुंतलेल्या असतात, की त्यांना ब्रँडिंग, कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये मागे पडतात. त्या संस्थांचे काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे, यासाठी त्या काम करतात. यंदा इलिशा एका फूड पॅन्ट्रीसोबत काम करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

