गुढी पाडव्यानिमित्त १० हजार आंबा पेटी दाखल

गुढी पाडव्यानिमित्त १० हजार आंबा पेटी दाखल

Published on

गुढीपाडव्याला आंबा हंगामाची सुरुवात
१० हजार पेट्यांची आवक; पाच ते दहा हजारांदरम्यान आंब्यांचे भाव

जुईनगर, ता. १९ (बातमीदार) : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील घाऊक बाजारात आंबा हंगामाची सुरुवात झाली आहे. यंदा आवक लक्षणीयरीत्या घटल्याचे दिसून आले. अवकाळी पावसामुळे उत्पादन कमी झाल्याने बाजारात केवळ १० हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. याचा थेट परिणाम आंब्यांच्या वाढलेल्या भावांवर झाला आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील घाऊक फळ बाजारात आंबा हंगामाची औपचारिक सुरुवात झाली. यंदा सुमारे १० हजार आंबा पेट्यांची आवक झाली असून, व्यापाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पूजन करून हंगामाचे स्वागत केले; मात्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याची आवक लक्षणीयरीत्या कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या वर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर सुमारे २५ हजार आंबा पेट्या बाजारात आल्या होत्या. यंदा ही संख्या निम्म्याहूनही कमी राहिल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे राज्यातील आंबा पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादन घटले असून, त्याचा थेट परिणाम बाजारातील भावांवर झाला आहे. परिणामी, यंदा आंब्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. पाडव्याच्या मुहूर्तावर घाऊक बाजारात पाच डझन आंब्यांची एक पेटी दर्जानुसार पाच हजार ते १० हजार रुपयांदरम्यान विकली गेली. उच्च प्रतीच्या आंब्यांना अधिक मागणी असून, त्यांचे भावही जास्त असल्याचे चित्र आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आंब्याला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असल्याने शेतकरी श्रद्धेने आपला पहिला माल मुंबई बाजारात पाठवतात. तसेच शहर आणि उपनगरांतील किरकोळ विक्रेतेही या दिवशी विक्रीची सुरुवात करत असल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
— —
सध्या आवक कमी असली, तरी १ एप्रिलपासून मे महिन्यापर्यंत आंब्याची उपलब्धता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काळात भाव काही प्रमाणात स्थिर होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

- संजय पानसरे, फळ बाजार संचालक व आंबा व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com