एसआयआयएलसी
एसआयआयएलसी
महारेरा परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
पुणे, ता. १९ : महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (महारेरा) अंतर्गत रिअल इस्टेट एजंट परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, ती १ एप्रिल २०२६ पर्यंत खुली राहणार आहे. ज्या उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे, त्यांनी तत्काळ परीक्षा अर्ज प्रक्रिया करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी प्रशिक्षण पूर्ण करूनही गेल्या टप्प्यात परीक्षा अर्ज भरू न शकलेले उमेदवारही आता अर्ज करू शकतात. महारेरा परीक्षेसाठी २० तासांचे अधिकृत प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. जे सहभागी सध्या प्रशिक्षण घेत आहेत, त्यांनी परीक्षा अर्ज प्रक्रिया बंद होण्यापूर्वी प्रशिक्षण पूर्ण करावे, जेणेकरून त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या सुरुवातीस विलंब होणार नाही. प्रशिक्षण व परीक्षेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. महारेरा अधिकृत प्रशिक्षणासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी इच्छुकांनी संपर्क साधावा. संपर्क : ८४८४८२२८५५, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२, ७३५०००१६०३
हाउसकिपिंग व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन
हाउसकिपिंग सेवांची वाढती मागणी लक्षात घेऊन व्यावसायिक सेवा व स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी २१ व २२ मार्चला हाउसकिपिंग व्यवसाय प्रशिक्षण आयोजिले आहे. यामध्ये हाउसकिपिंग क्षेत्रातील मूलभूत संकल्पना, प्रत्यक्ष कामाचे तंत्र आणि व्यवसायासाठी कौशल्यांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. हाउसकिपिंग क्षेत्राची ओळख, साधने व उपकरणांसोबतच सॉफ्ट स्किल्स, ग्राहक संवादावर भर देणार आहे. तसेच हाउसकिपिंग व्यवसायाची प्रक्रिया, निविदा प्रक्रिया, कोटेशन व प्रस्तावाची पद्धत, मार्केटिंग व ग्राहक मिळविण्याचे मार्ग समजावून सांगितले जातील. गुणवत्ता नियंत्रण, ग्राहक टिकवून ठेवण्याची तंत्रे, व्यवसाय वाढ व कमाईचा आराखडा यावरही मार्गदर्शन होणार आहे.
औषधी वनस्पती लागवड ऑनलाइन कार्यशाळा
आयुर्वेदिक व सेंद्रिय उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी जास्त असल्याने गेल्या काही वर्षात औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वनौषधींची लागवड पद्धतीविषयी मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २६ मार्चला आयोजिली आहे. यामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीचे महत्त्व आणि व्याप्ती, वनौषधी व सुगंधी वनस्पतींचे शेतजमिनीला होणारे फायदे, वनस्पती लागवडीचे तंत्र, नर्सरीचे तंत्र, व्यावसायिकदृष्ट्या लागवडीच्या पद्धती, औषधी वनस्पतींची प्राथमिक प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, लागवड व प्रक्रिया उद्योगासाठीच्या सरकारी योजना, मार्केटिंगसाठी असणारा वाव आदींविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

