हिंदू संस्कृतीचा अनोखा जागर
हिंदू संस्कृतीचा अनोखा जागर
तुर्भे, ता. १९ (बातमीदार) : विश्व हिंदू परिषदेच्या मठ-मंदिर आणि अर्चक पुजारी आयाम, नवी मुंबई जिल्ह्यातर्फे पुढील वर्षीच्या महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हिंदू परंपरेनुसार वाढदिवस साजरा करण्याच्या उद्देशाने मोफत वाढदिवस हवन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च २०२६ या महिन्यांत वाढदिवस असलेल्या भाविकांसाठी पहिला सामूहिक हवन सोहळा शनिवारी (ता. २१) सायंकाळी ५ वाजता दिवाळे कोळीवाड्यातील शिवमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये वैदिक पद्धतीने हवन करून वाढदिवस साजरा केला जाणार असून, सहभागी भाविकांना धार्मिक वातावरणात आध्यात्मिक अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले. अनेकांनी आपल्या कुटुंबासह सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. तसेच ज्यांची नावे अद्याप नोंदणीत समाविष्ट झालेली नाहीत त्यांनीही पुढे येऊन सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा मंत्री स्वरूप गोरखनाथ पाटील, मंदिर अर्चक पुरोहित आयाम जिल्हा सहप्रमुख अनिलकुमारजी माटे, बेलापूर प्रखंड मंत्री संदीप मुरलीधर सोनटक्के तसेच सह-मंत्री ज्ञानेश्वर कोळी हे प्रमुख पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

