आरोग्य कर्मचारी मानधनापासून वंचित

आरोग्य कर्मचारी मानधनापासून वंचित

Published on

भिवंडी, ता. १९ (वार्ताहर) : भिवंडी महापालिकेअंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या डॉक्टर, परिचारिका; तसेच रक्त तपासणीसाठी काम करणाऱ्या एकूण १९७ कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नसल्याने त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पालिका मुख्यालयात धाव घेत प्रशासनाचे लक्ष वेधले.
पालिका क्षेत्रात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत १९२ कर्मचारी तर ३९६ आशासेविका कार्यरत असून, त्यांच्या मानधनासाठी सुमारे ७० लाख रुपयांचे अनुदान मिळते. मात्र, डिसेंबरपासून हे अनुदान प्राप्त झालेले नसल्याने मानधन रखडले आहे. याबाबत संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांनी दिली.
दरम्यान, मंगळवारी विशेष महासभेनंतर महिला कर्मचाऱ्यांनी महापौर नारायण चौधरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेट घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच नगरसेवक ॲड. मयुरेश पाटील यांनी आयुक्त अनमोल सागर यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या. मानधनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

उपासमारीची वेळ
मानधन रखडल्यामुळे कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. आम्ही तुटपुंज्या मानधनावर काम करत असून चार महिने पगार न मिळाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कर्ज काढून संसार चालवावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया कर्मचारी सुगंधा कांबळे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com