उल्हासनगरात संस्कृती जपूया, परंपरा टिकवूया

उल्हासनगरात संस्कृती जपूया, परंपरा टिकवूया

Published on

उल्हासनगर, ता. १९ (वार्ताहर) : ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांच्या साक्षीने आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी उल्हासनगर दुमदुमले. शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने भव्य स्वागत यात्रेने शहरभर उत्साहाची लाट निर्माण केली. स्वागत यात्रेत ‘आपली संस्कृती जपूया, परंपरा टिकवूया’ असा सकारात्मक संदेश देण्यात आला.
उल्हासनगर कॅम्प नंबर ४ येथील बहिणाबाई चौधरी चौकातून यात्रेला सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषेत सजलेले महिला-पुरुष, युवक-युवती आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशा पथकांच्या दमदार तालावर आणि पारंपरिक नृत्य सादरीकरणांनी यात्रेला वेगळेच आकर्षण लाभले. भगव्या ध्वजांनी सजलेले रस्ते आणि जयघोषांनी दुमदुमलेले वातावरण यामुळे संपूर्ण शहरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. ही यात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज मैदानात समारोप झाली. कार्यक्रमादरम्यान पोलिस प्रशासन व स्वयंसेवकांनी उत्कृष्ट नियोजन करून शिस्तबद्ध व्यवस्था राखली, त्यामुळे यात्रा निर्विघ्न पार पडली.

उल्हासनगर : नववर्षाच्या स्वागतासाठी पारंपरिक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com