कोपर उड्डाणपुलावर अपघात; दोन पोलिस जखमी
कोपर उड्डाणपुलावर अपघात; दोन पोलिस जखमी
डोंबिवली, ता. १९ : डोंबिवलीतील कोपर उड्डाणपुलावर भरधाव उबर कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन पोलिस जखमी झाले. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या अपघातात हवालदार जगदीश जयसिंग काकडे आणि पोलिस शिपाई नरूळे जखमी झाले. उपचारानंतर काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. कारच्या क्रमांकाच्या आधारे आरोपीची ओळख नफिज अहमद शेख अशी पटली असून, तो अद्याप फरार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

