वादळी वाऱ्याचा चारोटी परिसराला फटका; डीपी घरावर कोसळून मोठे नुकसान, वीजपुरवठा खंडित

वादळी वाऱ्याचा चारोटी परिसराला फटका; डीपी घरावर कोसळून मोठे नुकसान, वीजपुरवठा खंडित

Published on

वादळी वाऱ्याचा चारोटी परिसराला फटका
डीपी घरावर कोसळून मोठे नुकसान, वीजपुरवठा खंडित

कासा, ता. २० (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात चारोटी परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठा फटका बसला आहे. ११ केव्ही वीजवाहिनीवरील डीपी (डिस्ट्रिब्युशन ट्रान्स्फॉर्मर) थेट घरावर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत संबंधित घराचे मोठे नुकसान झाले असून परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ८ ते ८.३०च्या दरम्यान अचानक वादळी वारा व अवकाळी पावसाने जोर धरला. या वादळामुळे चारोटी परिसरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर कोसळल्या. त्याच वेळी मुख्य वीजवाहिनीवरील डीपीचा खांब कमकुवत झाल्याने तो थेट एका घरावर कोसळला. या दुर्घटनेत घराचे छत व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले. डीपी कोसळल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा तत्काळ खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. दरम्यान, या अवकाळी पावसाचा फटका स्थानिक व्यावसायिकांनाही बसला आहे. विशेषतः वीटभट्टी व बांधकामाशी संबंधित व्यावसायिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. पावसामुळे तयार विटा भिजून त्यांचे नुकसान झाले असून आर्थिक फटका बसल्याची तक्रार व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com