ठाणे महापालिकेत महायुतीतील ठरावांचा मान राखावा – गणेश नाईक

ठाणे महापालिकेत महायुतीतील ठरावांचा मान राखावा – गणेश नाईक

Published on

महायुतीतील ठरावांचा मान राखावा
वनमंत्री गणेश नाईक यांचे मत

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : नवी मुंबईतील परिस्थिती वेगळी आहे; मात्र ठाणे आणि कल्याण येथे महायुती म्हणून निवडणुका लढल्या आहेत. त्या वेळी झालेल्या चर्चांचा सन्मान राखणे आवश्यक असल्याचे मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले. तसेच याबाबत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६ संदर्भात माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी उपमहापौर कृष्णा पाटील, शहराध्यक्ष संदीप लेले आणि भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबईतील घडामोडींमुळे ठाणे महापालिकेतील विविध समित्या व स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या रखडल्याबाबत छेडले असता, त्यांनी वरील मत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेच्या दिशेने राज्य सरकार वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्व घटकांचा विचार करणारा आहे. मच्छीमारांसाठी एक हजार २०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून पाणीपुरवठा योजनांनाही प्राधान्य दिले आहे. शहरी भागात १३५ एमएलडी तर ग्रामीण भागात ५६ एमएलडी पाणीपुरवठा वाढवण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली. वनविभागाच्या कामकाजाबाबत बोलताना, विदर्भातील वाघांच्या संख्येनुसार प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र सफारी उभारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरांमध्ये बिबट्यांचा वाढता वावर रोखण्यासाठी वनखाते सतर्क असून आतापर्यंत सुमारे ४५० बिबट्यांना पकडण्यात आले आहे. त्यापैकी काहींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून लवकरच ठाणे व पालघर जिल्ह्यात बिबट सफारी उभारली जाणार आहे. वन्यप्राण्यांची शिकार रोखण्यासाठी कडक उपाययोजना सुरू असून पुढील तीन वर्षांत परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com