लहान बालिकेवर केला लैंगिक अत्याचार पोस्को अंतर्गत आरोपीस अटक
बालिकेवर अत्याचारप्रकरणी एकाला अटक
मुरुड, ता. २० (बातमीदार) ः एका पाचवर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका ५२ वर्षीय व्यक्तीने हे कृत्य केले. पीडित पाचवर्षीय मुलगी ही आपल्या घराजवळ खेळत असताना संबंधित आरोपीने या मुलीस गोड बोलून आपल्या घरी नेले. तिच्यासोबत अश्लील चाळे करून मोबाईलमधील अश्लील फोटोही तिला दाखवले. या प्रकारामुळे मुलगी घाबरली. तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिने आईला सांगितला. याबाबत कुटुंबीयांनी मुरूड पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश रसेडे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

