“केवणीतील रेती माफियांवर मोठी कारवाई; ८० ते ९० लाखांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट”

“केवणीतील रेती माफियांवर मोठी कारवाई; ८० ते ९० लाखांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट”

Published on

केवणीतील रेतीमाफियांवर मोठी कारवाई
८० ते ९० लाखांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट

वज्रेश्वरी, ता. २० (बातमीदार) ः ठाणे जिल्ह्यातील केवणी येथे सुरू असलेल्या अनधिकृत रेती उत्खनन व साठवणुकीवर महसूल प्रशासनाने शुक्रवारी (ता. २०) कारवाई केली. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील तसेच उपविभागीय अधिकारी सानप यांच्या स्पष्ट सूचनेनुसार भिवंडी तहसीलदार अभिजित खोले यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान केवणी येथील रेती बंदरावर छापा टाकण्यात आला. छाप्यात पाच सेक्शन व आठ बार्ज असा एकूण अंदाजे ८० ते ९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व साहित्याचा वापर अनधिकृतपणे खाडीतून रेती उपसा करून त्याची वाहतूक करण्यासाठी होत असल्याचे उघड झाले. प्रशासनाने संबंधित बार्ज व साहित्याला आग लावून तसेच पाण्यात बुडवून पूर्णपणे नष्ट केले.

Marathi News Esakal
www.esakal.com