मुंबई
मोखाड्यात पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान
मोखाड्यात पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान
मोखाडा (बातमीदार) ः रयत शिक्षण संस्थेच्या मोखाड्यातील रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रयत माउली लक्ष्मीबाई पाटील यांच्या ९६व्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या वेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. एस. आर. व्हंडे यांनी रयत माउलींच्या कार्याचे स्मरण करताना लक्ष्मीबाईंच्या त्याग, कष्ट, शिक्षणसेवेप्रतीच्या निष्ठेचा उल्लेख करून त्यांच्या जीवनमूल्ये अंगीकारावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. एस. जी. मेंगाळ यांनी रयत माउली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेतील मोलाच्या योगदानाचा आढावा घेतला.

