शहर विकासासाठी समित्यांना बळ
शहर विकासासाठी समित्यांना बळ
सदस्यसंख्या नऊ वरून १५ करण्याचा निर्णय
विरार, ता. २१ (बातमीदार)ः वसई-विरार पालिकेच्या महासभेत महिला बालकल्याण, आरोग्य समित्यांचे अधिकृत गठन करण्यात आले. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता सदस्य संख्या नऊ वरून १५ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
वसई-विरार पालिकेची महासभेची सुरुवात वादळी झाली. सभागृह नेते प्रफुल्ल साने यांनी सदस्य संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला. या वेळी विकासकामांना गती देण्यासाठी सदस्य संख्या नऊ वरून १५ करण्यात यावी, असे नमूद केले. त्यामुळे नव्या रचनेनुसार संख्याबळाच्या आधारावर बहुजन विकास आघाडीचे नऊ, तर भाजपचे सहा सदस्य नियुक्त केले आहेत. तसेच नगरसेविकांऐवजी बाहेरचे सदस्य घेण्याचा ठराव संमत केला.
--------------------------------
महिला-बालकल्याण समिती
बविआ ः बिना फुट्याडों, सुवर्णा पाटील, ॲड. दिप्ती भोईर, ज्योत्स्ना भगली, प्रदीपिका सिंह, प्रमिला पाटील, ॲड. अस्मिता पाटील, अमृता चोरघे, संगीता भेरे.
भाजप : निम्मी दोषी, ख्याती घरत, मीरा निकम, संजना भायदे, सान्दी यंदे, स्मिता पाटील.
================================
आरोग्य समिती
बविआ ः डॉ. शुभांगी पाटील, सचिन देसाई, डॉमनिक रुमाव, अरुणा डाबरे, झीनत जाहिदी, निशाद चोरघे, आशीष वर्तक, नीलेश देशमुख,
भाजप : योगिता गवळी, किशोर पाटील, विशाल जाधव, हितेश जाधव, अवधेश श्रीवास्तव, जितेंद्र राऊत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

