‘वसईचा पर्यटन विकास दुर्लक्षित’

‘वसईचा पर्यटन विकास दुर्लक्षित’

Published on

‘वसई भविष्यातील पर्यटनवाढीचे केंद्र’
विरार (बातमीदार)ः तालुक्यात ऐतिहासिक, धार्मिक, सागरी पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहे. त्यांच्या विकासासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार राजन नाईक यांनी विधानसभेत केली. वसई तालुक्यात वसई व अर्नाळा येथे ऐतिहासिक किल्ले आहेत. त्याचबरोबर जीवदानी देवी, तुंगारेश्वर, बौद्ध स्तूप अशी धार्मिक ठिकाणे आहेत. वसई तालुक्याला समृद्ध सागरीकिनारा लाभला आहे. विशेषत: मुंबईपासून जवळचा परिसर असल्यामुळे राज्य सरकारने पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी आमदार राजन नाईक यांनी केली. वसई तालुक्यात शेकडो घरे ५० ते १०० वर्षांपूर्वीची आहेत. मात्र, या घरांना ओसी नसल्याच्या कारणावरून महापालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात नाही. या नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com