भिवंडीत पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला

भिवंडीत पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला

Published on

भिवंडीत पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला
१४ ग्रामपंचायतींसाठी २८ एप्रिलला मतदान
भिवंडी, ता. २१ (वार्ताहर) : तालुक्यातील विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या १४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. सरपंच आणि सदस्यांचे निधन, राजीनामा किंवा अन्य कारणांमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. या पोटनिवडणुकीसाठी २८ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून, २९ एप्रिलला निकाल जाहीर होईल, अशी माहिती तहसीलदार अभिजित खोले यांनी दिली आहे.

तालुक्यातील २३ सदस्य पदे आणि २ थेट सरपंच पदांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. ३० मार्चला निवडणुकीची अधिकृत नोटीस प्रसिद्ध होणार असून, ७ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र (अर्ज) सादर करण्याची मुदत आहे. १५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल. १७ एप्रिलला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आणि निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. २८ एप्रिलला प्रत्यक्ष मतदान होणार असून, २९ एप्रिलला मतमोजणी आणि निकाल लागेल.

या गावांमध्ये होणार निवडणूक :
कवाड खु., पिळंझे खु., मोरणी, गणेशपुरी, सुपेगाव, कारीवली, खरीवली, पालखणे, घोटगाव, कुसापुर, सापे, मोहंडुळ, केल्हे आणि अंबाडी या ग्रामपंचायतींमध्ये ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण २३ सदस्यांसह दोन थेट सरपंच निवडीचाही समावेश आहे. प्रशासनाने या प्रक्रियेसाठी आवश्यक तयारी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com