हॉटेल व्यावसायिक चितिंत
हॉटेल व्यावसायिक चितिंत
पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट
पालघर, ता. २१ ः युद्धजन्य स्थितीमुळे राज्यात हॉटेल क्षेत्राला विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे.
सध्याच्या एलपीजी पुरवठ्यासाठी रुग्णालये, रेल्वे, शैक्षणिक संस्था आणि संरक्षण सेवा यांसारख्या अत्यावश्यक क्षेत्रांसाठी प्राधान्य दिले जात आहे. उर्वरित पुरवठा त्यानंतर इतर क्षेत्रांना वितरित केला जातो. ज्यामुळे गॅसची उपलब्धता अपुरी पडत असल्याचे मंत्री भुजबळ यांनी मान्य केले. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हॉटेल्ससाठी पर्यायी इंधन म्हणून रॉकेलचा (केरोसीनचा) वापर करण्याच्या विचार केला जाऊ शकतो. तसेच रेस्टॉरंट उद्योगाला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजनांची शिफारस केली जाईल, असे आश्वासन भुजबळ यांनी दिले.
-----------------------------
‘परवान्याची मुदत वाढवा’
एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे मंत्री भुजबळ यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत रेस्टॉरंटच्या मद्य परवान्याच्या नूतनीकरणाचा मुद्दा मांडला गेला. परवाना नूतनीकरण करण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या सिलिंडर समस्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत असल्याने परवान्याची मुदत वाढवण्याची मागणी केली.

