मोफत औषधे आणि दंत चिकित्सा शिबिर

मोफत औषधे आणि दंत चिकित्सा शिबिर

Published on

दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन

बोर्डी (बातमीदार) : लायन्स क्लब ऑफ बोर्डी आणि डॉ. सुहेती वर्तक वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २२) मोफत औषध व दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर कै. आत्मारामपंत सावे सभागृह, बोर्डी मराठी शाळा येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टर्समार्फत दातांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. या वेळी त्यांना मोफत औषधेही वितरित करण्यात येणार आहेत. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्लब ऑफ बोर्डी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com