पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

Published on

रोजगार मेळाव्याला तरुणांचा प्रतिसाद

पालघर, ता. २१ (बातमीदार) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर, मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा पागधरे इन्स्टिट्यूट, दुसरा मजला, मच्छीमार सोसायटी, माहीम रोड, पालघर येथे झाला. या वेळी असंख्य तरुणांनी रोजगार मेळाव्याला उपस्थिती दर्शवली होती. या मेळाव्याला १०३ उमेदवारांनी सहभाग नोंदवला, ज्यातील ३४ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. तसेच उर्वरित रिक्त पदांसाठी अद्याप भरती प्रक्रिया सुरू असून इच्छुक उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पागधरे इन्स्टिट्यूट संस्थेचे अधिकारी/कर्मचारी तसेच जिल्हा कार्यालयाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध झाल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com